आधुनिक शेतीकृषी तंत्रज्ञानयशोगाथाशेती सल्ला

तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी..

तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी..

जिल्ह्यात नवीन तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी ५ मार्च २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाईन नोंदणी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादनाला अनुकूल वातावरण असून, या उद्योगात सातत्याने वाढ होत आहे. तुती लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत असून, एक एकर क्षेत्रातून दुसऱ्या वर्षापासून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येत आहे.
रेशीम कोष उत्पादनाच्या वाढत्या प्रमाणामुळे जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाचे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण रेशीम उद्योगाद्वारे साध्य होत असल्याचे चित्र आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी १ एकर तुती लागवड, जोपासना व कीटक संगोपन गृहासाठी तीन वर्षांत एकूण 895 मनुष्य-दिवसांची मजुरी दिली जाते. यामध्ये मजुरीपोटी रु. 2 लाख 79 हजार 240 व साहित्यासाठी रु. 1 लाख 53 हजार असे एकूण 4 लाख 32 हजार 240 अनुदान देण्यात येते.
केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 योजनेअंतर्गत तुती लागवडीसाठी प्रति एकर 54 हजार, सिंचन संचासाठी प्रति एकर 54 हजार, कीटक संगोपन गृहासाठी 2 लाख 43 हजार 750, संगोपन साहित्यसाठी 37 हजार 500, व निर्जंतुकीकरण औषधांसाठी 3 हजार 750 असे एकूण 3 लाख 75 हजार अनुदान उपलब्ध आहे. बहुभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून २ एकर तुती लागवड करता येऊन एकूण 5 लाख 62 हजार 500 अनुदान दिले जाते.
कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत तुती लागवडीसाठी 45 हजार, रेशीम कीटक संगोपन गृहासाठी 2 लाख 43 हजार 750 व संगोपन साहित्यासाठी 36 हजार 375 असे एकूण 3 लाख 25 हजार 125 अनुदान देण्यात येते. बुलढाणा जिल्ह्यातील ३१० गावांमध्ये पोकरा योजना लागू असून, इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करावा.
मनरेगा व सिल्क समग्र-2 योजनेसाठी नोंदणी व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, बुलढाणा (भोंडे हॉस्पिटल समोर, मुठ्ठे लेआऊट, धाड रोड) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. विजय ठाकरे यांनी केले आहे.

वैभव रोकडे

मी वैभव रोकडे, एक कृषीप्रेमी आणि डिजिटल क्रिएटर असून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा ध्यास घेतला आहे. शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, सरकारी योजना, नवीन तंत्रज्ञान आणि माझे प्रत्यक्ष अनुभव सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावेत या हेतूने मी ‘कृषिमित्र’ हा ब्लॉग सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!